पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. शहरात राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना पत्रकारांना लांब ठेवलं जात होतं. गेल्या आठवड्यामध्ये पिंपरीत झालेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनयकुमार चौबे यांना सांगूनदेखील त्यांच्या इतर अधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा पत्रकारांना नेत्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी थेट अजित पवार यांना प्रश्न विचारत पोलिसांकडून पत्रकारांना का अडवलं जात आहे? अशी विचारणा केली. यावेळी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून खडे बोल सुनावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणताही मोठा नेता शहरामध्ये आला की प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवत पत्रकारांना नेत्यांपर्यंत पोहोचू न देणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस यांची आज पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना बोलवून घेत फैलावर घेतले. चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात महानगर पालिकेच्या कार्यक्रमासाठी अजित पवार आले होते.

हेही वाचा – पिंपरी : गॅस गळतीमुळे आकुर्डीत भंगाराच्या दुकानास आग, चार जण जखमी

यापूर्वीही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना या संदर्भात सूचना दिल्या असतानाही आजही पोलिसांनी अजित पवार यांच्याकडे पत्रकार जात असताना त्यांची अडवणूक केली. त्यामुळे अखेर पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे पोलिसांची तक्रार केली आणि अजित पवार यांनी चौबे यांना खडेबोल सुनावले. दरम्यान, २२ तारखेला मोठा उत्साह राहणार असून सर्व इमारतींवर रोषणाई करण्यात येणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा वाढणार

नेमकं अजित पवार पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना काय बोलले?

बंदोबस्तामुळे तुमचे लोक पत्रकारांना पुढे येऊ देत नाहीत. पत्रकारांना पुढे येऊ दिले पाहिजे, त्यांना थांबवू नये. आता असं होणार नाही याची काळजी घ्या. सर्व पक्षीय नेते आल्यास त्यांना त्यांचं काम करू द्या. त्यांच्याशी बोलायचं की नाही हे आमचा अधिकार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on the complaint of denying entry to journalist in pune kjp 91 ssb