पिंपरी : भंगार मालाच्या दुकानात स्वयंपाक करत असताना गॅस गळती झाल्याने भडका होऊन लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास आकुर्डीगावठाण येथे घडली. पोपट आडसूळ ( वय ५०)  संतोष चव्हाण (४५), श्रीकांत कांबळे (३२) आणि  नरेश चव्हाण (३८) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी पोपट २० टक्के तर संतोष हे ३५ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

हेही वाचा >>> मेट्रो स्थानकातील थरार! ट्रॅकवर पडलेले मायलेक…वेगाने येणाऱ्या गाड्या अन् सुरक्षारक्षकाने घेतली धाव…

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी

आकुर्डीत अक्षय या नावाने भंगार मालाचे दुकान आहे. दुकानाच्या आतमध्ये  छोट्या पत्र्याच्या घरामध्ये जखमी व्यक्ती राहत आहेत. सायंकाळी घरामध्ये स्वयंपाक करत असताना मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. त्यामुळे भडका उडून आग लागली. त्यामध्ये चौघे जखमी झाले आहेत. तर, आगीत पुठ्ठे, प्लास्टिक भंगार, रिकामे कॅन, बॅटरी जळाले आहे. प्राधिकरण, थेरगाव, संत तुकारामनगर येथील बंब घटनास्थळी दाखल झाले होते. जवानांनी  अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले.