पुणे : कर्मचाऱ्यांचा वेतनातून भविष्य निर्वाह निधी कपात करुन ७० लाख ९२ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत राहुल एकनाथ कोकाटे (वय ५१, रा. क्रिमसन क्रिस्ट सोसायटी, तुपेनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील टिळेकरनगर परिसरात सिंहगड सिटी स्कूल आहे. या शाळेतील ११५ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधी कपात करण्यात आला. ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतनानतून एकूण मिळून ७४ लाख ६८ हजार ६२६ रुपये कपात करण्यात आले. त्यापैकी तीन लाख ७५ हजार ७७४ रुपये भविष्य निर्वाह कार्यालयात जमा करण्यात आले. उर्वरित ७० लाख ९२ हजार ८६२ रुपयांचा अपहार करण्यात आला.

हेही वाचा… धक्कादायक! ४० रेल्वे प्रवाशांना अन्नातून विषबाधा; भारत गौरव यात्रेतील प्रकार

हेही वाचा… राष्ट्रपती तीन दिवस पुणे दौऱ्यावर

नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा न करता अपहार केल्याचे कोकाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. नवले यांच्याविरुद्ध कोकाटे यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशाने नवले यांच्याविरुद्ध अपहार केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered against maruti navale of sinhgad institute about embezzlement in provident fund of employees of sinhgad city school pune print news rbk 25 asj