पुणे: चेन्नईहून पुण्याला येणाऱ्या भारत गौरव यात्रेच्या गाडीमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली. सर्व ४० प्रवाशांवर ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने उपचार केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. आता सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे.

चेन्नईहून पुण्याला येणा-या भारत गौरव यात्रेदरम्यान अनेक प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली. तपासणीत प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले. ही प्रवाशांनी बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मध्यरात्री रेल्वे पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. तात्काळ ससून रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांनी उपचारासाठी रेल्वे स्थानकावर धाव घेतली.

indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल

हेही वाचा… ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचे भुजबळांना आव्हान : म्हणाले, ‘भुजबळांनी राजीनामा देऊन मैदानात…’

विषबाधा झालेल्या ४० प्रवाशांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. रेल्वे प्रशासन आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. रेल्वे गाडीत खाद्यपदार्थांची सेवा देणा-यांची चौकशी केली जात आहे. याचबरोबर खाद्यपदार्थांचे नमुने तपासणी साठी ताब्यात घेण्यात आले आहेत.