पुणे : अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका तरुणास हडपसर पोलिसांनी अटक केली. सूरज संतोष पवार (वय २१, रा. वेताळबाबा झोपडपट्टी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार याच्या विरुद्ध बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : अश्लील ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची ज्येष्ठाला धमकी, साडेचार लाखांची खंडणी उकळली  

आरोपी सूरज अल्पवयीन मुलीच्या भावाचा मित्र आहे. त्याने अल्पवयीन मुलाला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. मोबाइलवर छायाचित्रे तसेच ध्वनीचित्रफित काढली. समाजमाध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. आरोपी सूरज तिला धमकावत होता. ही बाब तिने कुटुंबीयांना सांगितली. मुलीने याबाबत नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सूरजला अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक डांगे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hadapsar police arrested 21 year old youth for threatening and raping minor girl pune print news rbk 25 zws