पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सद्बुद्धी सरकारला द्यावी, असं साकडं मनोज जरांगे यांनी तुकोबा चरणी घातलं आहे. मनोज जरांगे हे पुण्यातील देहू दौऱ्यावर होते. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील कानाकोपरा पिंजून काढण्याचे काम जरांगे करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे म्हणाले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक झालो. मराठा आरक्षणासंदर्भात या सरकारला सद्बुद्धी द्यावी हेच साकडं मी तुकोबा चरणी घातलं. महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आहे. यांना दोन अंग आहेत. क्षत्रिय मराठा आणि शेती करणारा, म्हणजेच कुणबी मराठा. याच माझ्या समाजाला सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे हेच साकडं मी तुकोबा चरणी घातला आहे. सरकारने शंभर टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावे असेही म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘एनडीए’च्या दीक्षांत संचलनाला राष्ट्रपतींची उपस्थिती

हेही वाचा – विमानांच्या पर्यावरणपूरक जैवइंधनासाठी ‘जट्रोइको’ ; आयसर पुणेच्या विद्यार्थ्यांचा संशोधन प्रकल्प

देहूत मनोज जरांगे यांची रॉयल एन्ट्री झाली. देहूच्या प्रवेशद्वारपाशी जेसीबीने फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जरांगे यांनी देहूकरांना एक तास संबोधित केले. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर पुढची दिशा ठरवू. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मागे हटायचे नाही, असे म्हणत अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil royal entry in dehu pune took tukoba darshan kjp 91 ssb