पुणे: पुण्यातील येरवडा भागात बीएमडब्लू गाडी रस्त्यात थांबवून मद्यधुंद तरुणाने लघुशंका केल्याची घटना घडली. त्यावेळी स्थानिकांनी हटकल्यानंतर त्या तरुणाने अश्लील हावभाव करून तेथून भरधाव कारने निघून गेला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी मुख्य आरोपी गौरव मनोज अहुजा हा गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूला भाग्येश निबजीया ओसवाल शेजारी बसलेला होता. या दोघांविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान हे प्रकरण उजेडात आल्यानंतर याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याच दरम्यान या प्रकरणातील आरोपी भाग्येश निबजीया ओसवाल याला पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्य आरोपी गौरव मनोज अहुजा हा अद्याप फरार आहे. त्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केली आहेत.
गौरव आहुजा याच्या हॉटेलबाहेर आंदोलन
पुण्यातील या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय नेत्यांकडून आरोपींवर कठोर करावाईची मागणी केली जात आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव मनोज अहुजा याचे स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण चौकात क्रीम किचन नावाने बिअर बार हॉटेल आहे. त्या हॉटेलबाहेर गुलाबो गँगच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी गौरव आहुजा याच्या फोटोला जोडे मारून आणि त्याचा फोटो जाळण्यात आला. यावेळी हॉटेल मध्ये काही लोक दारू पीत असल्याचा आरोपही आंदोलन कर्त्यांनी केली. तसेच गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
© The Indian Express (P) Ltd