पुणे: आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन तीन दिवस झाले.त्या निमित्ताने भाजपचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. त्यानंतर शहरातील इतर मंडळाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,मी दरवर्षी पुण्यात येऊन मानाच्या गणपतीचे दर्शन घेत आहे. पुण्याचे आणि गणेशोत्सवाचे नाते आहे. पुणे शहरातून सार्वजनिक गणेशोत्सव देशभर पोहोचला आहे. त्याची खरी सुरुवात पुण्याने केली आहे.गणरायाने सर्व विघ्न दूर करावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्य सरकारने हा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी एवढी सकारत्मकता दाखवल्यावर निश्चित मार्ग निघेल अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

हेही वाचा >>>चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची क्षमा मागितली, असं का केलं त्यांनी?

संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. त्यावरून अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते मत मांडत आहेत. त्या दरम्यान पुरुष मंडळी कारभार पाहतील असे विधान बच्चू कडू यांनी मांडले आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की,महापालिका,जिल्हा परिषद यामध्ये महिलांना आरक्षण दिले. त्यावेळी देखील अशाच प्रकारची विधान करण्यात आली होती.पहिल्या पाच वर्षांत त्या प्रकारच वातावरण होते.पण त्यामध्ये हळूहळू बदल होत गेला. तसेच आजही आरक्षण नसताना संसदेत ८१ महिला खासदार आहेत. आता आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १०० महिलांची भर पडणार आहे. त्यामुळे मी त्यांच्या मताशी सहमत नसल्याची भूमिका मांडली.

लालबागचा राजा गणपती मंडळाच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहे.त्या प्रश्नावर ते म्हणाले की,पोलिसांचा बंदोबस्त कमी पडलेला नाही.लालबाग मंडळाशी आम्ही चर्चा करतो. पण खर आहे की, खूप गर्दी होते आणि त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त पुरेसा आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statement of devendra fadnavis regarding dhangar samaj reservation in pune svk 88 amy
Show comments