महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. खासदार अमोल कोल्हे रविवारी भोसरी विधानसभेतील इंद्रायणीनगर भागात गाव भेट दौऱ्यावर होते. यावेळी निओ रिगल सोसायटीत मतदारांना भेटत असताना त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. खासदार कोल्हे यांच्या स्वागतानंतर सोसायटीतील रहिवाशी आपले मनोगत मांडत होते. त्याच वेळी एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या मनातील खदखद व्यक्त करत असताना या ज्येष्ठ नागरिकाने माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दलची नाराजी तीव्र शब्दात व्यक्त करायला सुरुवात केली. त्यांच वेळी भाषेतील कडवटपणा लक्षात येताच, कोल्हे यांनी तत्काळ त्यांना थांबवलं आणि माईक आपल्या हातात घेतला.

हेही वाचा – यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा

शरद पवार यांची साथ सोडून गेलेल्यांमुळे सर्वानाच मनस्ताप झाला, हे खरं असलं तरी टीका करताना आपण आपली राजकीय सभ्यता सोडायची नाही, असं आवाहन केलं. समोरून राजकारणाचा स्तर घसरला असला तरी आपण आपला स्तर घसरू द्यायचा नाही, असे हात जोडून आवाहन कोल्हे यांनी मतदारांना केलं.

हेही वाचा – निम्म्या पुण्याचा पारा चाळीशी पार, जाणून घ्या कुठे, किती तापमान…

कोल्हे यांनी दाखवलेल्या सुसंस्कृतपणाबद्दल मतदारांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं. शिवनेरी किल्ल्यावरही कोल्हे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट झाली असता कोल्हे यांनी त्यांच्या वयाचा मान राखत त्यांच्या पाया पडून नमस्कार केला होता. कोल्हे यांच्या याच सुसंस्कृतपणाचा अनुभव रविवारी इंद्रायणीनगरमधील मतदारांनीदेखील घेतला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did amol kolhe pull the mic from a person hand incidents in bhosari constituency kjp 91 ssb