साखरपुड्यानंतर होणाऱ्या पतीचं निधन, विधवेसारखं आयुष्य जगली मराठमोळी अभिनेत्री
अभिनेत्री नंदा, जिने अनेक सुपरस्टार्सबरोबर काम करून ९० हून अधिक चित्रपट केले, तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटेपणा नशिबी आला. मनमोहन देसाई यांच्याशी साखरपुडा झाल्यानंतर त्यांच्या निधनाने नंदाला मोठा धक्का बसला. त्यानंतर तिने विधवेसारखं आयुष्य स्वीकारलं. नंदा फक्त पांढरे कपडे घालू लागली आणि स्वतःला एकाकी करून घेतलं. २०१४ मध्ये तिचं निधन झालं.