भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त; गवईंकडे सूत्रे सोपवताना झाले नि:शब्द!
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आज निवृत्त झाले. त्यांनी न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्याकडे पदाची सूत्रे सोपवली. खन्ना यांनी न्यायव्यवस्थेचे महत्त्व आणि विविधतेचे कौतुक केले. बी. आर. गवई उद्या ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. गवई यांचा जन्म अमरावतीत झाला असून, त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई आंबेडकरी चळवळीचे प्रमुख नेते होते.