‘बॉल हरवला, सूर्यकुमार यादव शोधत राहिला’, आयपीएलच्या मॅचमध्ये गल्ली क्रिकेटसारखी शोधाशोध
आयपीएलच्या ५०व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने २३ चेंडूत ४८ धावा करत ऑरेंज कॅप मिळवली. राजस्थानचा संघ १६ षटकांत ११७ धावांवर सर्वबाद झाला. सामन्यात एक मजेशीर घटना घडली, सूर्यकुमार यादव सीमारेषेबाहेर गेलेला चेंडू शोधताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.