छगन भुजबळ यांचं विधान; “पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देश नाही, त्यांना…”
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने शस्त्रविराम झाला. छगन भुजबळ यांनी पाकिस्तानवर विश्वास ठेवता येत नाही असं सांगितलं आणि भारताने योग्य वेळी बदला घेतल्याचं म्हटलं.