कुणाल कामरा म्हणाला होता पोलिसांना सहकार्य करणार, पण समन्स बजावूनही पोहचलाच नाही
कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर म्हटलेल्या वादग्रस्त गाण्यामुळे चौकशीसाठी बोलावलं होतं, पण तो हजर राहिला नाही. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. कामराने माफी मागणार नसल्याचं सांगितलं असून पोलिसांना सहकार्य करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, तो चौकशीला हजर न झाल्याने आणखी एक समन्स बजावलं जाण्याची शक्यता आहे.