बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया हिला हत्येच्या आरोपाखाली अटक
प्रसिद्ध बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया हिला रविवारी ढाका विमानतळावर अटक करण्यात आली. तिने 'मुजीबः द मेकिंग ऑफ अ नेशन' या बायोपिकमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारली होती. मागील वर्षी जुलैमध्ये शेख हसीना यांच्या विरोधात जनआंदोलन उसळले होते. त्यावेळच्या हत्येच्या प्रयत्नाशी संबंधित प्रकरणात नुसरत फारियाला अटक करण्यात आली आहे.