“शुद्धीवर आलो तेव्हा आजूबाजूला…”, पहलगामला गेलेल्या मराठी पर्यटकाने सांगितला थरार!
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक उपस्थित होते. नवी मुंबईचे सुबोध पाटील यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या अनुभवांचे कथन केले. गोळीबाराच्या आवाजाने ते जमिनीवर झोपले आणि बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यावर त्यांनी आजूबाजूला मृतदेह पाहिले. एका स्थानिकाने त्यांना मदत करून हॉस्पिटलमध्ये पोहोचवले, जिथे ते सात दिवस उपचार घेत होते.