Premium

संजय राऊत यांच्यामुळेच दिघेंना टाडा लागला- शिंदे गटाचा आरोप

धर्मवीर २ मध्ये देखील अशाच प्रकारे चुकीचा असणार असून त्याची कथा देखील चुकीची असणार असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याला शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर देत राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.

anand dighe, eknath shinde, shiv sena, sanjay raut, TADA case
संजय राऊत यांच्यामुळेच दिघेंना टाडा लागला- शिंदे गटाचा आरोप

ठाणे : संजय राऊत यांनी आनंद दिघेंची मुलाखत ‘लोकप्रभा’ मध्ये छापली होती आणि त्यामुळेच दिघे यांना टाडा लागला होता, असा आरोप शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी केला आहे. राऊत आणि मातोश्रीने दिघेंचा नेहमीच दुस्वास केला, असा आरोपही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागातील कथा चुकीची होती. काही व्यक्तिमत्वांना मोठे करण्यासाठी चित्रपट काढण्यात आला होता, म्हणून उद्धव ठाकरे आणि आम्ही उठून निघून गेलो होतो. त्याच प्रमाणे धर्मवीर २ मध्ये देखील अशाच प्रकारे चुकीचा असणार असून त्याची कथा देखील चुकीची असणार असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याला शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी प्रतिउत्तर देत राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.

हेही वाचा… “धर्मवीर दोन”मधून २०२४ची पायाभरणी? पहिल्यातून बंडाचे निशाण, दुसऱ्यातून नेतृत्वावर शिक्कामोर्तब?

हेही वाचा… आता ‘धर्मवीर २’ चित्रपटातील दृश्य कापावे लागणार नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले स्पष्टीकरण

धर्मवीरच्या पहिल्या भागात काही बंधने होती. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांना राऊत आणि मंडळी कसा त्रास देत होती, कसे खच्चीकरण करायचे हे दाखवले नव्हते. दिघे यांच्यासोबत नेमके काय झाले होते हे दुसऱ्या भागात आपल्याला कळेलच, असे म्हस्के यांनी सांगितले. दिघे यांचे निधन झाल्यानंतर पहिला प्रश्न विचारला गेला, तो म्हणजे, त्यांची संपत्ती कुठे कुठे आहे, त्या सर्व गोष्टी लोकांसमोर येतील. संजय राऊत आणि मातोश्रीने दिघे यांचा जो दुस्वास केला, तो पहिल्या भागात दाखवता आला नाही. त्यांची इच्छा असावी, या सर्व गोष्टी पुन्हा दाखवाव्यात. त्यामुळे ते अशा पद्धतीने वक्तव्य करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे आणि उरलेली शिवसेना संपविण्याची सुपारी राऊत यांनी शरद पवार यांच्याकडून घेतली असल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला. धर्मवीर आनंद दिघे आम्ही जगतो, दिघे यांचे आत्मचरित्र लोकांसमोर आणणे हा राजकीय स्वार्थ नसून सामाजिक स्वार्थ असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Due to sanjay raut tada case registered against anand dighe allegations by shinde group asj

First published on: 28-11-2023 at 10:17 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा