नवरा बायकोच्या नाते हे जगावेगळे असते. या नात्यात नेहमी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असते. लग्नापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ते एकमेकांची साथ देतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजोबा वृद्ध पत्नीला चालण्यासाठी काठीने आधार देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं प्रेम दाखवणारा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आजी आजोबा पायी चालताना दिसत आहे.आजी वाकून चालताना दिसत आहे.आजोबांच्या एका हातात काठी आहे तर दुसऱ्या हातात सुद्धा काठी दिसत आहे. दुसऱ्या हातात असलेल्या काठीने आजोबा वृद्ध पत्नीला चालण्यासाठी आधार देत आहे.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
dj_knoxx_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रेमात पडणं आणि प्रेम करणं खूप सोपं असतं पण शेवटपर्यंत प्रेम करुन कोणत्याही परिस्थितीत आपल्या व्यक्तीची साथ न सोडणं म्हणजेचं खरं प्रेम”

हेही वाचा : VIDEO : भर सामन्यात विराट कोहलीने केली धोनीची नक्कल, पाहा मजेशीर व्हिडीओ

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पूर्वीची लोकं सुखी आणि समाधानी होते कारण त्यांच्याकडे अशी निस्वार्थ प्रेम करणाऱ्या व्यक्ती होत्या ज्या गाडी, बंगला, पैसा किंवा सुंदरतेवर नाही तर त्याच्या मनावर प्रेम करायच्या” तर एका युजरने लिहिलेय, “हेच खरं प्रेम आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “वय जर झालं तर प्रेम हे तरुण असते खूप छान आई बाबा”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A true love old man give support to his old wife for walking at old age emotional and lovely video goes viral on social media ndj