सोशल मिडियावर पती-पत्नीच्या वादाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी पतीने पत्नीला धोका दिल्याने तर कधी पत्नीने नवऱ्याची फसवणूक केल्यामुळे वाद होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पतीने पत्नीला घटस्फोट दिल्यामुळे ती आपल्या नवऱ्याला घटस्फोट का दिला? असा प्रश्न विचारताना दिसत आहे. शिवाय व्हिडीओमध्ये ती मोठमोठ्याने ओरडतानाही दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बिहारमधील जहानाबाद येथील असल्याचं सांगितलं जात आहे. येथील एका महिलेचा पती परदेशातून परतल्यानंतर त्याने तिला घटस्फोट दिल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय तो तिला घरात ठेवण्यासही नकार देत आहे. यामुळे रागवलेल्या महिलेने सर्वांसमोर त्याला जाब विचारल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यावेळी ती महिलेला नवऱ्याने घेतलेला निर्णय मान्य नसल्यामुळे ती खूप आरडाओरडा करत नवऱ्याला आपल्याला घटस्फोट देऊन दूर न जाण्याची विनवणी करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये, बुरखा घातलेली एक महिला दिसत आहे, यावेळी तिचा पती एका वकिलाबरोबर बाईकवरुन जाताना दिसत आहे. यावेळी ती महिला पळून जाणाऱ्या नवऱ्याला थांबवताना दिसत आहे. तसेच लग्नाच्या एका वर्षातच परदेशात गेल्यानंतर तो तिला मागे ठेवून घटस्फोट कसा देऊ शकतो? असा जिवाच्या आकांताने प्रश्न विचारताना दिसत आहे.
मी तुला जाऊ देणार नाही…
व्हायरल व्हिडीओमधील महिला तिच्या नवऱ्याला, “मी तुला जाऊ देणार नाही, ११ महिने जे माझ्याबरोबर केलेस ते विसरलास का, मी तुला जाऊ देणार नाही.” असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. यावेळी ती नवऱ्याला थाबंवण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहे. शिवाय बाईकवर बसलेल्या पतीला ती खाली खेचते आणि त्याला पकडून जोरजोरात आरडाओरडा करते.
यावेळी बाईक चालवणाऱ्या पतीच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता महिला “त्याला तु शांत रहा, मी माझ्या नवऱ्याशी बोलत आहे” असे म्हणते शिवाय त्यानंतर ती रागात नवऱ्याला, “तो आपल्यामध्ये का येत आहे, मी त्याच्याशी लग्न केले आहे का?” असा प्रश्न विचारताना दिसत आहे. तर या महिलेच्या नवऱ्याबरोबर असणारा व्यक्ती कपड्यांवरुन त्याचा वकील असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करत आहेत. तसेच खरंच नवऱ्याने पत्नीला धोका दिला असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणीही नेटकरी करत आहेत.