सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेहमीच हे व्हिडीओ हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. कधी कधी काही व्हिडीओ तर आपल्याला खूप काही शिकवून जातात.लोकांना हसवणारे व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. मात्र, यामध्ये असे काही व्हिडिओ असतात जे एकदा पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. जरी हे व्हिडिओ स्क्रिप्टेड केलेले असले तरी लोकांना ते पुन्हा पुन्हा पहायला आवडतात. सध्या असाच एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण त्याच्या आईला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगत आहे. मात्र, यादरम्यान, आईने एक गुपित उघड केले जे प्रेयसीला माहीत नव्हते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडसोबत पार्कमध्ये बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, तो त्याच्या आईला व्हिडिओ कॉल करतो, तो त्याच्या गर्लफ्रेंडची आईला ओळख करून देण्यासाठी कॉल करतो. यावेळी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मुलगा त्याच्या आईला हॅलो मम्मी म्हणतो. मग तो म्हणतो की मी तुला सांगितलं होतं… हे बघ तुझी भावी सून आहे. यानंतर प्रेयसीही डोके टेकवून आईला नमस्ते आंटी म्हणते.

आईनं मुलाचं पितळ उघडं पाडलं

इथपर्यंच सर्वकाही सुरळीत सुरु होतं, मात्र तेव्हाच आईने आपल्या मुलाबद्दल असे गुपित उघड केले की गर्लफ्रेंडचा पारा चांगलाच चढला. आपल्या मुलाच्या प्रश्नाला उत्तर देताना आई म्हणाली की आधी होती तिच्यापेक्षा ही चांगली आहे. हे एकून गर्लफ्रेंड चांगलीच चिडते आणि बॉयफ्रेंडकडे रागाने बघू लगते. कोण ती कोण ती असे प्रश्नही ती विचारते. यावर घाबरलेला मुलगा ‘कोणी नाही’ म्हणतो. मग तो आईला म्हणतो की तू मस्करी का करतेस. पण गर्लफ्रेंडला त्याच्यावर संशय येतो आणि ती मुलगी कोण आहे हे विचारून त्याचा हात फिरवायला लागते. यानंतर बॉयफ्रेंड आईशी नंतर बोलू असे सांगून फोन ठेवतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – लोकवस्ती आणि धावत्या मेट्रोमध्ये फक्त एका हाताचं अंतर; दिल्ली मेट्रोचा ‘हा’ संतापजनक VIDEO एकदा पाहाच

@superhumour नावाच्या एका इंस्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. काही युजर्सनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, ‘स्मार्ट आई’. ‘मार गया बेटा’. यासारख्याच अनेक गमतीशीर प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boyfriend introducing girlfriend to his mother and suddenly mother talk about his ex gilfriend video viral on social media srk