Viral Video : कुत्रा हा माणसाचा आवडता प्राणी मानला जातो. कुत्रा हा अतिशय प्रामाणिक आणि माणसाचा चांगला मित्र म्हणून ओळखला जातो.
सोशल मीडियावर कुत्र्याबरोबरच्या मैत्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली कुत्र्यासाठी खास गाणं गाताना दिसत आहे. व्हिडीओचं कुत्र्यावरील प्रेम पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली कुत्र्याजवळ बसली आहे आणि प्रेमाने कुत्र्यासाठी गाणं म्हणतेय. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकली कुत्र्यासाठी “पल पल दिल के पास…” हे लोकप्रिय गाणं म्हणतेय. चिमुकलीचे गाणं कुत्रा तिच्याकडे प्रेमाने बघून ऐकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या घरच्या कुत्र्याची आठवण येऊ शकते.

हेही वाचा : Cricket Dance : क्रिकेट डान्स पाहिला का? पाहा हा अनोखा डान्स प्रकार, व्हिडीओ होतोय व्हायरल

stray_puppies_paws या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर व्हिडीओ” आणखी एका युजरने लिहिलेय, “चिमुकली आणि कुत्रा दोघेही खूप गोंडस आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog viral video a child girl sing a song pal pal dil ke pass for dog lovely video ndj