Viral Rickshaw Father Emotional Quote Video : रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा ऑटोरिक्षा, बाईक किंवा ट्रक, टॅक्सीच्या मागे काही ना काही चिमटे काढणारी भन्नाट वाक्ये, थोरांचे विचार, अंजनदायी सुविचार किंवा संदेश लिहिलेले दिसतात. ते वाचून काही वेळा खूप हसायला येते. पण, त्यातील काही संदेश फारच भावनिक आणि विचार करायला लावणारे असतात. काही संदेशांमधून आई-वडील, पत्नी आणि इतर नात्यांविषयी अतिशय सोप्या आणि सुंदर शब्दांत भाष्य केलेले असते. ते वाचून प्रश्न पडतो की, रिक्षा, ट्रकचालक व मालकाला एवढं भन्नाट लिहून घ्यायला सुचत कसं… रिक्षावर लिहिलेले असे विचार नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या अशाच एका रिक्षावरील विचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो वाचून अनेकांना वडिलांची, त्यांच्या कष्टाची जाणीव होत आहे. तर, काहींच्या डोळ्यांत वडिलांच्या आठवणीने अश्रू दाटून येत आहेत. लिहिलेल्या या संदेशामध्ये नेमकं
काय लिहिलं आहे ते जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिक्षाचालकानं असं नेमकं काय लिहिलं आहे?

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, पुण्याच्या रस्त्यावरून एक काळ्या रंगाची रिक्षा वेगाने धावताना दिसत आहे. यावेळी रिक्षामागून जाणाऱ्या वाहनातील एका व्यक्तीने त्या रिक्षाच्या मागे वडिलांविषयी लिहिलेला एक सुंदर संदेश आपल्या मोबाईलमध्ये कैद केला, जो वाचल्यानंतर अनेकांना आपल्या वडिलांच्या कष्टाची, त्यांच्या प्रेमाची आठवण झाली आहे. काही जण तर खूपचं भावूक झालेत. आता तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल की, रिक्षाचालकाने नेमके असे लिहिले तरी काय आहे?

रिक्षाच्या मागे लिहिला बापाविषयी काळजाला भिडणारा संदेश

j

j

रिक्षाचालकाने रिक्षाच्या मागील छोट्या खिडकीच्या खाली बापाविषयी काळजाला भिडणारा संदेश लिहिला आहे. “कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप…” यातून त्याने ज्या वडिलांनी तुम्हाला लहानाचे मोठे होईपर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, तुमचे लाड केले, हट्ट पुरवले, चुकले तिथे ओरडले, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सावलीप्रमाणे साथ दिली, ते वडील म्हणजे साक्षात देव आहेत. त्यामुळे काही न सांगता ज्याला सर्व गोष्टी कळतात, तुमच्या वाईट काळात जो सावलीसारखा उभा असो तो म्हणजे बाप असतो, त्यासाठी त्याला तुमच्याकडून कोणत्याही परतफेडीची अपेक्षा नसते. त्यामुळे जन्मदात्या बापाची सेवा करा, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या रिक्षावर लिहिलेल्या संदेशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

थंडीमध्ये सकाळी बाईक लगेच स्टार्ट होत नाहीयेय? मग फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स, एका झटक्यात बाईक होईल सुरू

puneri_explorer नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेक जण या व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये भावनिक कमेंट्स करताना दिसत आहेत. तसेच आपल्या आयुष्यातील बाबांचे स्थान अधोरेखित करण्याचा प्रयत्न करीत आहे. एकाने आपल्या बाबांसाठी लिहिलेय, “अगदी बरोबर आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “सर्वस्व वडील.” तिसऱ्या एका युजरने लिहिले, “लाखात एक गोष्ट बोललास भावा.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional quote viral video rickshaw driver write heart touching best line for father side of rickshaw see heart warming video sjr