first the spelling was written on the blackboard and then the taj mahal was made from it | Loksatta

तरुणाने शब्दांपासून बनवला ताजमहाल! व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

व्हिडिओतील मुलगा फळ्यावर खडूने ताजमहालचे सुंदर चित्र काढताना दिसत आहे

Taj Mahal drawing trending Video
सोशल मीडियामुळे अनेकजण रात्रीत स्टार झाल्याची अनेक उदाहरण आपण पाहिली आहेत. (Photo : Instagram)

सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना हक्काचा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. शिवाय सोशल मीडियामुळे अनेकजण एका रात्रीत स्टार झाल्याचंही आपण पाहिलं आहे. कोणी आपल्या भन्नाट डान्समुळे तर कोणी आपल्या आवाजामुळे रात्रीत फेमस झाल्याची अनेक उदाहरणं पाहिली आहेत. सध्या असाच एक मुलगा आपल्या चित्रकलेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेमस झाला आहे. शिवाय या मुलाची चित्रकला पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. तर नेटकऱ्यांनी या मुलाकडे अप्रतिम टॅलेंट असल्याचं म्हटलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलगा एका फळ्यावर आधी ताजमहालचे इंग्रजीत स्पेलिंग लिहितो आणि त्या स्पेलिंगवरच ताजमहालचे सुंदर चित्र बनवतो. सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचं दिसत आहे. कारण अनेकांनी हा व्हिडीओतील मुलाचे तोंडभरुन कौतुक केलं आहे.

हेही वाचा- तरुणाने चक्क शेणापासून कमावले लाखो रुपये, चपलांसह अनेक सजावटीच्या वस्तू बनवण्याचा सुरु केला व्यवसाय

व्हिडिओत तुम्हाला दिसेल की, एक मुलगा एका फळ्यावरती खडूने चित्र काढताना दिसत आहे. तो पहिल्यांदा इंग्रजीत ताजमहाल हा शब्द लिहितो आणि त्यानंतर तो या स्पेलिंग न पुसता त्यावरच ताजमहालच चित्र काढतो. ताजमहालचे चित्र काढणाऱ्या या मुलाचा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- वडिलांनी चक्क चमच्याने कापले मुलाचे केस, व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालचे स्पेलिंग ब्लॅकबोर्डवर लिहून या व्यक्तीने चित्र काढल्याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर तो आतापर्यंत ३ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना मुलाचे तोंडभरुन कौतुकही करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 16:37 IST
Next Story
Bank Of Maharashtra Recruitment 2023: २२५ रिक्त जागांची मोठी भरती; कधी, कुठे व कसा कराल अर्ज?