scorecardresearch

वडिलांनी चक्क चमच्याने कापले मुलाचे केस, व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

वडील चक्क चमच्याने मुलाचे केसं कापत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे

Father doing his son's haircut with spoon
वडील मुलाचे केस कापतानाचा अनोखा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. (Photo : instagram)

सोशल मीडियावर सध्या एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. कारण या व्हिडीओती व्यक्ती स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चमच्याने आपल्या मुलाचे केस कापले आहेत. कदाचित हे तुम्हाला पटणार नाही. मात्र, या घटनेचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा व्हिडीओ एका इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओतील एक व्यक्ती स्वयंपाकघरातील चमच्याने आपल्या मुलाचे केस कापताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी व्हिडीओतील व्यक्तीचे अनोखे टॅलेंट पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. शिवाय अनेकांनी हा व्हिडीओ पाहून त्यावर मजेदार कमेंटही केल्या आहेत.

हेही पाहा- आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला हवेत उडणाऱ्या बाईकचा Video; म्हणाले, “जगभरातील पोलीस दलात…”

व्हिडिओमध्ये एक लहान मूल कॅमेऱ्यासमोर बसलेले दिसत आहे. यावेळी त्याचे वडील त्याचे केस कापताना दिसत आहेत. पण ते ज्या वस्तूने केस कापत आहेत. ते पाहून अनेकांना आश्चर्याला धक्का बसला आहे. कारण या मुलाचे वडील चक्क स्वयंपाकघरातील चमच्याने आपल्या मुलाचे केसं कापले आहे. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.

हेही पाहा- लहान मुलांचे फोटो काढणाऱ्या पालकांना IFS अधिकाऱ्याने दिला सावधानतेचा इशारा; थरारक Video शेअर करत म्हणाले…

कारण हा संपूर्ण व्हिडीओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत शूट करण्यात आला आहे, यासाठी टाईम लॅप्सचा वापर केला आहे. ज्यामध्ये केस कापण्याची प्रक्रिया सुरुवातीपासून गतीने पाहता येत आहे. तर या व्हिडीओत महत्त्वाचा भाग स्लो मोशनमध्ये दाखवला आहेआणि व्हिडिओच्या शेवटी मुलाचे केस कापून पुर्ण झाल्याचं दिसत आहे.

या अनोख्या आणि मनोरंजक घटनेचा व्हिडिओ ari_rover नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “ही अप्रतिम कला आहे,” तर दुसर्‍या एका व्यक्तीने लिहिलं आहे की, “हे तुम्ही कसे हे माहित नाही, परंतु हे खूप अद्भुत असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने लिहिलं आहे असा हेअरकट मी आदपर्यंत पाहिला नव्हता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 10:37 IST