scorecardresearch

तरुणाने चक्क शेणापासून कमावले लाखो रुपये, चपलांसह अनेक सजावटीच्या वस्तू बनवण्याचा सुरु केला व्यवसाय

ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणाऱ्या शेणापासून चप्पल, नेमप्लेट, दिवे अशा अनेक वस्तू तयार करता येऊ शकतात

Shoe from dung
शेणाचा वापर करून तुम्ही पैसे कमावू शकता आणि इतरांना रोजगारही मिळवून देऊ शकता (The Better India)

ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणाऱ्या शेणापासून चप्पल, नेमप्लेट, दिवे अशा अनेक तयार करता येऊ शकतात, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कारण आपण शेणाचा वापर फक्त शेतीत टाकायचं खत म्हणून करतो. जास्तीत जास्त घर सारवण्यासाठी आणि काही ठिकाणी शेकोटीत पेटवण्यासाठी शेणापासून तयार केलेल्या शेणींचा वापर करतो. मात्र या शेणाचा वापर करून तुम्ही पैसे कमावू शकता आणि इतरांनाही रोजगार मिळवून देऊ शकता. हो कारण उत्तराखंडमधील एका व्यक्तीने शेणापासून विविध वस्तू बनवूण त्या बाजारात विकण्यास सुरुवात केली आहे.

द बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, उत्तराखंडच्या काशीपूर येथिल रहिवासी असलेल्या नीरज चौधरी नावाच्या शेतकऱ्यानं शेणापासून वेगवेगळ्या पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तू तयार केल्या आहेत. नीरज मागील ६ वर्षांपासून श्री ‘बंसी गौ धाम’ या नावानं आपला व्यवसाय चालवत आहे. त्याच्या या अनोख्या उपक्रमामुळे गावाकडे केवळ खत म्हणून वापर करण्यात येणाऱ्या शेणापासून आता अनेकांना उद्योग सुरु करता येऊ शकतो.

हेही पाहा- वडिलांनी चक्क चमच्याने कापले मुलाचे केस, व्हायरल Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

नीरजने सांगितलं, ‘ते आधी शेण सुकवतात नंतर त्या शेणाच्या पावडरपासून विविध गोष्टी बनवतात आणि नंतर पपईच्या दुधाने किंवा जवसाच्या तेलाने पॉलिश करतात.’ शिवाय सहज उपलब्ध होणाऱ्या शेणाचा ते कच्चा माल म्हणून वापर करतात. त्यामुळे असा व्यवसाय करण्यासाठी जास्त खर्चही येत नाही. त्याने पुढे सांगितलं की, ‘आम्ही प्रथम शेणावर प्रक्रिया करतात नंतर ते वाळवले जाते आणि गिरणीत घालून बारीक केलं जाते. त्यानंतर, विविध साच्यांमध्ये टाकून, त्यात सुमारे १० टक्के किंवा १५ टक्के नैसर्गिक डिंक असतो या डिंकाचा वापर करुन आम्ही विविध प्रकारची उत्पादने बनवतो.’

हेही पाहा- आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला हवेत उडणाऱ्या बाईकचा Video; म्हणाले, “जगभरातील पोलीस दलात…”

दरम्यान, शेणापासून या विविध गोष्टी तयार करण्याची कल्पना आपणाला कशी सुचली हे देखील नीरज यांनी सांगितलं, तो म्हणाला, मी रस्त्यावर फिरत असलेल्या निराधार गाईंना पाहिलं. त्यावेळी त्यांच्या शेणाचा वापर करून वस्तू तयार करण्याची कल्पना सुचली. शिवाय ते या वस्तू तयार करण्याआधी प्रथम कॉम्पुटराईज्ड प्रिंट तयार करतात. त्यानंतर साचे त्या आकाराचे बनवून डिझाईनुसार शेणाची पेस्ट तयार करतात. या व्यवसायानं अनेकांना रोजगार दिला आहे. शिवाय ते या व्यवसायातून लाखो रुपये कमावतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 15:22 IST