VIRAL VIDEO : कुत्रा आणि साप यांच्यातील भयानक झुंज तुम्ही पाहिली आहे का? पहा हा व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ अवघ्या १७ सेकंदांचा असून आतापर्यंत १५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

VIRAL VIDEO : कुत्रा आणि साप यांच्यातील भयानक झुंज तुम्ही पाहिली आहे का? पहा हा व्हायरल व्हिडीओ
(photo: twitter/@Vicious Videos)

कुत्रा हा जगातील सर्वात आवडत्या पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. कुत्र्याला अत्यंत बुद्धिमान आणि जगातील सर्वात निष्ठावान प्राणी मानले जाते. जे त्यांच्या मालकांसाठी किंवा काळजीवाहूंसाठी काहीही करण्यास तयार असतात. तुम्ही पाहिलं असेल की कुत्रे अनेकदा घराच्या रक्षणात गुंतलेले असतात. जर कोणताही अनोळखी प्राणी घरात घुसण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आजूबाजूला फिरत असेल तर जोपर्यंत तो त्याला हाकलून देत नाही तोपर्यंत तो सुटकेचा नि:श्वास सोडत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. जो पाहून नक्कीच तुमचा थरकाप उडेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा घरात घुसलेल्या एका महाकाय साप समोरसमोर येतात. कुत्रा सापावर खूप भुंकतो आणि त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो, पण तो सापही बेधडकपणे फणा पसरवत तिथेच बसतो. यादरम्यान कुत्रा त्याच्या जवळून भुंकताच त्याच्यावर हल्ला करतो. त्यानंतर दोघांमध्ये खूप भांडण होते. मात्र, अखेर या लढतीत कुत्र्याचाच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. तो आपल्या तीक्ष्ण आणि धारदार दातांनी सापाला ओरबाडून जखमी करतो, त्यानंतर तो साप पूर्णपणे गतिहीन होऊन जमिनीवर पडतो. कुत्रा आणि साप यांच्यामधील ही झुंज थरकाप उडवणारी आहे.

(हे ही वाचा: Viral Video : ही भयानक मगर त्याच्या मांडीवर खेळते, सगळं काही ऐकते; विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ एकदा पहाच)

( हे ही वाचा: Kerala:कौतुकास्पद! मुस्लिम विद्यार्थ्यांनी जिंकली रामायण प्रश्नमंजुषा स्पर्धा)

कुत्रा आणि सापाच्या या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर व्हिशियस व्हिडीओ नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या १७ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत १५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ऐकावे ते नवलच! त्याने महिलेवर गोळी चालवली पण तीच गोळी लागून त्याचा मृत्यू झाला; पोलिसही चक्रावले
फोटो गॅलरी