scorecardresearch

Viral Video : ही भयानक मगर त्याच्या मांडीवर खेळते, सगळं काही ऐकते; विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ एकदा पहाच

सध्या सोशल मीडियावर मगरीचा एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस भयानक मगरीसोबत खेळताना दिसत आहे, त्याच्यावर प्रेम करत आहे.

Viral Video : ही भयानक मगर त्याच्या मांडीवर खेळते, सगळं काही ऐकते; विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ एकदा पहाच
instagram(photo/gatorboys_chiris)

जगात विविध प्रकारचे प्राणी आहेत, परंतु असे काही प्राणी आहेत, ज्यांना लोक त्यांचे पाळीव प्राणी बनवतात. यामध्ये कुत्रे, मांजर आणि घोडे इत्यादींचा समावेश आहे, परंतु तुम्ही कधी पाळीव मगर पाहिली आहे का? खरं तर मगर ही जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. पाळणे तर दूरच, त्यांच्या जवळ जाण्याचे धाडस कोणी करत नाही. मगरी या इतक्या धोकादायक असतात की त्या कोणत्याही व्यक्तीला क्षणात आपला बळी बनवू शकतात आणि त्यांना फाडून खाऊ देखील शकतात. म्हणूनच त्यांना ‘पाण्याचा राक्षस’ म्हटलं जात. सध्या सोशल मीडियावर मगरीचा एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे , ज्यामध्ये एक माणूस भयंकर मगरीसोबत खेळताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ पाहून असे वाटते की, मगर या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवते. त्याच्या मांडीवर खेळते आणि त्याला इजा देखील करत नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती व्यक्ती महाकाय मगरीजवळ येताच, मगर स्वतःचे मोठे तोंड उघडते आणि त्याच्याकडे पाहू लागते. यानंतर, ती व्यक्ती मगरीला पकडते आणि त्याला आपल्याकडे ओढून आपल्या मांडीवर बसवण्याचा प्रयत्न करते. यात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे ही मगर त्याच्या मांडीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, नंतर ती शांत होते आणि आरामात त्या व्यक्तीच्या मांडीवर बसते.

(हे ही वाचा: Kerala:कौतुकास्पद! मुस्लिम विद्यार्थ्यांनी जिंकली रामायण प्रश्नमंजुषा स्पर्धा)

(हे ही वाचा: Optical Illusion: या फोटोत जिराफ लपला आहे, शोधताना भल्या भल्यांना फुटला घाम, तुम्ही शोधू शकता का?)

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर gatorboys_chris या नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक करून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला मगरीसोबत मस्ती करताना पाहून काहीजण आश्चर्यचकित झालेत, तर काहीजण गंमतीने म्हणत आहेत की ही मगर पाळीव मांजरासारखी दिसतेय. एका वापरकर्त्याने कमेंटमध्ये आश्चर्य व्यक्त करत विचारले, ‘तुम्ही त्या मगरीला कसे उचलले? तिने तुला का खाल्ले नाही?’. किंबहुना, अशी महाकाय मगर कोणतीही इजा न करता माणसांसोबत राहते असे क्वचितच पाहायला मिळते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या