Viral video: सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हायरल व्हिडिओ देश-विदेशातलेही असतात. आजकाल कुणीही काहीही झालं तरी ते लगेच कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. आणि काही वेळातच ती गोष्ट व्हायरल होते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये पार्किन्सन्सचा आजार असलेली व्यक्ती पहिल्यांदाच गांजा खात आहे. (पार्किन्सन्स- यामध्ये मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते) यानंतर त्याची झालेली अवस्था पाहून तुम्हालाही भीती वाटेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पार्किन्सन आजार म्हणजे नेमके काय? यामध्ये मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते. जर एखाद्याला पार्किन्सन्सचा आजार असेल तर थरथरणे, स्नायुंमधील कडकपणा, चालणे आणि हालचाल करण्यास येणाऱ्या अडचणी आणि असंतुलन यांसारखी लक्षणे दिसून येतात.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीला पार्किन्सन्सचा विकार आहे. मात्र या व्यक्तीने गांजाचे सेवन केले आहे. यामुळे हा व्यक्ती विचित्र गोष्टी करत आहे.प्रथम ही व्यक्ती सोफ्यावर बसली आहे. पण गांज्याचा परिणाम होताच. ती व्यक्ती विचित्र पद्धतीने चेहरा करू लागते. यानंतर तो सोफ्यावर आडवा झाला. मग तो उठतो आणि विचित्र नजरेने त्याच्या हाताकडे बघू लागतो.त्यानंतर ही व्यक्ती त्याच्या जवळ बसलेल्या व्यक्तीशी बोलू लागते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: दारू पिऊन सैराट! तर्राट तरुणीचा मध्यरात्री भररस्त्यात धिंगाणा; शेवटी हॉटेल कर्मचाऱ्यांनी दाखवला इंगा

हा व्हिडीओ कुठचा आहे हे सांगता येणार नाही पण व्हिडीओ पाहिल्यानंतर हा व्हिडीओ भारतातील नाही हे स्पष्ट होतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले की, ‘हे त्याच्यासाठी मोठे पाऊल आहे. आशा आहे की त्याला आराम मिळाला असेल. कमेंट करताना, दुसर्‍या व्यक्तीने लिहिले, ‘हे त्या दुर्मिळ प्रकरणांपैकी एक आहे जिथे गांजा खरोखरच फायदेशीर ठरला आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man started doing strange things after smoking marijuana for the first time video goes viral srk