सध्या AI आणि AI वर चालणाऱ्या विविध ॲपची चर्चा सर्वत्र सुरू आहे. असे असतानाच, मायक्रोसॉफ्टने नुकतेच एक नवीन AI मॉडेल सादर केले आहे, ज्यामध्ये मानवी चेहरा असणारे फोटो, योग्य हावभावांसहित बोलू शकणारे हायपर-रिअलिस्टिक व्हिडीओ तयार करू शकते. मायक्रोसॉफ्टच्या VASA-1 ने डब केलेले, AI इमेज-टू-व्हिडीओ मॉडेल हे मानवी चेहरे असणाऱ्या स्थिर फोटोंचे अगदी जिवंत अशा ॲनिमेशनमध्ये सहज बदलू शकते. हे ॲनिमेशन अगदी खरे दिसण्यासाठी, ओठांची, डोक्याची हालचाल, चेहऱ्यावरील हावभाव हे सिंक्रोनाईझ करण्यात आले आहेत.

या ॲपचा वापर मोनालिसाच्या चित्रावर केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत. मायक्रोसॉफ्टच्या AI ने तयार केलेल्या आणि प्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दा विंचीने रेखाटलेल्या मोनालिसाने पाश्चिमात्य अभिनेत्री ॲनी हॅथवेच्या ‘पापाराझी’ या गाण्यावर लिप-सिंक केल्याचे दिसते.

हेही वाचा : ‘जिलब्या मारुती, डुल्या मारुती…’ पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरांना का पडली असतील अशी नावे? जाणून घ्या…

एक्स या सोशल मीडियावरून शेअर झालेल्या या व्हिडीओला “मायक्रोसॉफ्टने नुकतेच VASA-1 वापरकर्त्यांसाठी आणले आहे. या AI च्या मदतीने फोटो गाऊ शकतात आणि ऑडिओच्या मदतीने बोलूदेखील शकतात. हे अगदी अलीबाबाच्या EMO सारखेच आहे. दहा जबरदस्त उदाहरणांपैकी – १. “मोनालिसा पापाराझी हे रॅप गाणे गात आहे”, असे सांगणारे एक कॅप्शन लिहिले आहे. हा व्हिडीओ एक्स वापरकर्ता मिन चोईने शेअर केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहू.

“बापरे, हा व्हिडीओ पाहून मी तर पोट धरून हसत आहे”, असे एकाने लिहिले आहे.
” भन्नाट? की भयंकर? आता तर डीपफेकसारख्या गोष्टींना अजूनच चालना मिळणार असं दिसतंय.. असो..” असे दुसऱ्याने लिहिले.
“बापरे, डीपफेकसारखे तंत्रज्ञान तर दिवसेंदिवस झपाट्याने प्रगत होत चालले आहे”, असे तिसऱ्याने म्हटले.
“देवा! हे काय.. आत्ता हे जर लिओनार्डो दा विंची या चित्रकाराला पाहता आले असते तर?” असे चौथ्याने म्हटले.

हेही वाचा : Earth Day 2024 : जागतिक वसुंधरा दिनाची सुरुवात का आणि कधी झाली? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

एक्स वापरकर्ता @minchoin ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या आणि व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आत्तापर्यंत एकूण ७.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, व्हिडीओला १५.१ लाईक्सदेखील मिळाले आहेत.