sadhu dies when snake bites while posing for instagram reels unnao viral news | Loksatta

‘रील’साठी सापाबरोबर पोज देणं साधुला पडलं महाग; हकनाक गमावला जीव

साधू गळ्यात काळा विषारी साप घालून इन्स्टाग्राम रील निर्मात्यांसाठी पोज देत होता, त्यादरम्यान साप चावला. पुढे काय झाले ते येथे जाणून घ्या…

‘रील’साठी सापाबरोबर पोज देणं साधुला पडलं महाग; हकनाक गमावला जीव
photo(social media)

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून २५ सप्टेंबर रोजी एक हृदयद्रावक किस्सा समोर आला आहे. येथे राहणारा एक साधू गळ्यात काळा विषारी साप गुंडाळून इन्स्टाग्रामच्या रील निर्मात्यांसाठी पोज देत होता. यादरम्यान सापाने त्याला चावा घेतला, त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथून डॉक्टरांनी त्याला लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) मध्ये रेफर केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

धक्कादायक घटना

ही घटना शुक्रवारी घडली होती, मात्र शनिवारी संध्याकाळी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे उघड झाले. हा साधू काकोरी (लखनऊ) येथील बनिया खेरा गावचा रहिवासी आहे, त्याचे नाव बजरंगी साधू असून तो ५५ वर्षीय आहे. तो औरस परिसरातील भावना खेरा गावात गेल्या काही वर्षांपासून राहत होता.

(हे ही वाचा: ‘मैने पायल है छनकाई’ गाण्यावर महिलेने असा ताल धरला की…तुम्हालाही थिरकण्याचा मोह आवरणार नाही)

जाणून घ्या संपूर्ण घटना

वृत्तानुसार, परिसरात पंक्चर दुरुस्तीचे दुकान चालवणाऱ्या सुभेदाराच्या दुकानात एक विषारी काळा साप आढळून आला. सुभेदाराने काठीने सापाला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे पोहोचलेल्या बजरंगीने सुभेदाराला सापाला मारण्यास नकार दिला. त्यानंतर बजरंगीने सापाला पकडून पेटीत ठेवले आणि दुकानाबाहेर आणले.

रीलसाठी देत होता पोझ

रील बनवण्याची इच्छा असलेल्या काही उत्सुक प्रेक्षकांनी विचारल्यानंतर बजरंगीने डब्यातून सापाला बाहेर काढले आणि त्याच्या गळ्यात गुंडाळले आणि त्याच्यासाठी पोझ देऊ लागला. साधू कधी सापाला गळ्यात गुंडाळायचा तर कधी खांद्यावर आणायचा, या दरम्यान साप त्याला चावला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
VIRAL : पती, पत्नी और वो! एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात होता नवरा, मग बायकोने दोघांचं लग्न लावलं आणि आता…

संबंधित बातम्या

Video: नकली पोशाख घालून ‘तो’ चक्क मगरीजवळ जाऊन झोपला; तिचा पाय ओढला अन् तितक्यात…अंगावर काटा आणेल ‘हा’ क्षण
Video: राणादा लग्नात नाचताना झाला बेभान; जमिनीवर बसला, जोरात हात आपटला अन् तेवढ्यात…
जंगलात भटकणारा हत्ती चक्क रुग्णालयात घुसला, डॉक्टरांनी X-ray मशिनजवळ नेलं अन् घडलं…; Viral Video पाहून थक्क व्हाल
चेटकीण!, सोशल मीडियावरील ‘या’ व्हिडिओमुळे नेटकऱ्यांचा थरकाप
Viral Video: …आणि कोंबडी अंड्यांसोबत फुटबॉल खेळू लागली, नेटीझन्स म्हणाले ‘ही तर रोनाल्डोची जबरा फॅन’

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा
शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल
पंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या वकिलांचा दावा
ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच