सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओंचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाऊन पोहोचतात. सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म खरं तर कलाकौशल्यं दाखविण्यासाठी असला तरी कित्येक जण याचा सर्रास गैरवापर करताना दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी लोक असंवेदनशील झाले असून, अनेकदा ते आपली मर्यादा ओलांडताना दिसतात. व्ह्युजच्या नादात कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीयेत ना याचीही काळजी ते घेत नाहीत. या रीलच्या वेडेपणापायी अनेकांचे जीवही गेलेत. तरीही काही जणांना कुठे कधी काय करावं हेदेखील कळत नाही. सध्या अशीच एक धक्कादायक घटना घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका तरुणाला एका व्हिडीओसाठी स्वत:चे प्राण गमवावे लागले आहेत. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या…

एक चूक जीवावर बेतली

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये रीलसाठी एक तरुण मुलगा खूप उंचावरून नदीत उडी मारताना दिसतोय. अंतर खूप जास्त असल्याने आणि उडी चुकीच्या पद्धतीने मारली असल्याने त्या तरुण मुलाचा तिथेच जीव जातो. वरून त्याचे मित्र आवाज देत असतात, पण कोणीही त्याला वाचवण्यासाठी त्या नदीत उतरत नाही. फक्त एका रीलसाठी त्या मुलाचा जीव गेल्याचं या व्हिडीओमधून कळतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणाचा हा व्हिडीओ @attitude_marathi_dialogue_007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला “व्हिडीओ बनवण्याच्या नादात गेला जीव, जास्त वरून उडी मारल्यामुळे छातीला धपका बसला” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.२ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “उडी चुकीची मारली भावाने”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “पोहताना स्वत:ची काळजी घेत जा भावांनो”, तर एकाने “काय मित्र आहेत, तो डुबतोय तर त्याला वाचवायचं सोडून व्हिडीओ बनवतात… असे मित्र नसलेले बरे”, अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of a young man died due to making a video while jumping into a river dvr