आजवर तुम्ही ज्योतिषाने लोकांची फसवणूक केल्याच्या घटना ऐकल्या असतीलच. मात्र दोन तरुणांनी कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने एका ज्योतिषाचीच लुटल्याची घटना समोर आली आहे. कानपूरमधील दोन चोरटे एका ज्योतिषाच्या घरी कुंडली दाखवण्यासाठी गेले होते आणि ते त्याच्या घरातील सोन्याचे दागिने, आणि लाखोंची रोकड लुटून पसार झाले. याप्रकरणी पीडित ज्योतिषाने गोविंद नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषाने आरोप केला आहे की, हे दोन्ही तरुण आपल्या रागावलेल्या प्रेयसीची समजूत काढण्याचा मार्ग शोधण्यासाठी त्यांची कुंडली दाखवण्यासाठी आले होते. यावेळी कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने दोघांनी नियोजन करून ज्योतिषाला आपल्या प्लॅनमध्ये गोवले आणि त्याला नशेचे कोल्ड्रिंक प्यायला दिले ज्यामुळे तो बेशुद्ध झाला. यानंतर दोघांनी ज्योतिषाच्या घरातून लाखो रुपयांची रोकड, दागिने व इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तरुण शर्मा असे या ज्योतिषीचे नाव असून तो कानपूरच्या गोविंद नगर ब्लॉक २ मध्ये राहतो. जो घरीच कुंडली बघण्याचे काम करतो. त्याच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी दोन तरुण कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने आले आणि चौकशी करुन निघून गेले. यावेळी मी त्यांना २ ऑक्टोबरला यायला सांगितलं. मात्र दोघेही सोमवारी आले. यावेळी दोघांनी रागावलेल्या प्रेयसीला समजाण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशी ज्योतिषाकडे मागणी केली. यादरम्यान ज्योतिष घरात एकटा असल्याचे पाहून दोघांनी त्याला आपल्या बोलण्यात अडकवले आणि यानंतर ज्योतिषाबरोबर एकत्र जेवण केले आणि बराचवेळ तिथेच थांबले. यादरम्यान एकाने आपल्या पिशवीतून कोल्ड्रिंकची बाटली काढून ग्लासमध्ये ओतली आणि ज्योतिषाला प्यायला दिली, त्या कोल्ड्रिंक्समध्ये नशा चढेल असा पदार्थ मिसळल्याने ज्योतिष बेशुद्ध झाला. यानंतर दोन्ही तरुणांनी त्याच्या घरातून लाखो रुपयांची रोकड, दागिने, दोन मोबाईल व इतर मौल्यवान ऐवज लुटून पलायन केले.

एवढेच नाही तर ज्योतिषाच्या घरात लावलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआरही त्यांनी चोरून नेला. या प्रकरणी ज्योतिषाच्या तक्रारीवरून, गोविंद नगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Showed the horoscope and asked how to convince an angry girlfriend they made jyotish unconscious and took away all the belongings from the house in kanpur uttar pradesh sjr