पाळीव प्राण्यांना आवडीने घरी घेऊन जाणे आणि त्यांना कुटुंबातील एक सदस्य बनवणे असे अनेक प्राणीप्रेमी करतात. पण, रस्त्यावरच्या उपाशी तसेच जखमी प्राण्यांना घरी घेऊन जाणे आणि त्याचे संगोपन करणे म्हणजे त्याहून मोठी गोष्ट असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पहायला मिळाला आहे. ज्यात रस्त्याकडेला जखमी अवस्थेत झोपलेल्या श्वानाला एक महिला तिच्यासोबत घरी घेऊन जाते आणि त्याचे संगोपन करून त्याची काळजी घेताना दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ परदेशातला आहे. रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत एक कुत्रा झोपलेला दिसतो आहे. जखमी कुत्र्याला पाहून ती महिला त्याला उचलते, एका खोक्यात झोपवते. तसेच त्याला पाणी आणि अन्न खाऊ घालते. नंतर कापडामध्ये गुंडाळून त्याला झोपवते व त्याची पुरेपूर काळजी घेते. महिला कुत्र्यासोबत वेळ घालवते, त्याला समुद्रकिनाऱ्यावर खेळायला घेऊन जाते. यादरम्यान महिला कुत्र्याला दत्तक घेते. महिलेने कशाप्रकारे जखमी कुत्र्याची काळजी घेतली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा… ‘मैं मरता था जिन होठों पर…’,भोजपुरी गाण्यावर शिक्षकाने शिकवली रसायनशास्त्राची सूत्रं, काही मिनिटांतच VIDEO व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

रस्त्यावरच्या जखमी कुत्र्याला घेतले दत्तक :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, महिला कशाप्रकारे रस्त्यावरील कुत्र्याला पुन्हा एक नवा जन्म देते. कुत्रा रस्त्याच्या कडेला अगदीच जखमी अवस्थेत झोपलेला असतो, हे पाहून महिला त्याला उचलते आणि त्याला खाऊ घालते. तसेच त्याची काळजी घेऊन त्याला दत्तक घेते आणि त्याच्यासाठी एक छोटंस घर बनवून घेते. अगदीच आपल्या मुलाप्रमाणे समुद्रकिनारी फिरवताना, लहान मुलांशी त्याची मैत्री करून देताना दिसते. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आजारी कुत्र्याला वाचवणाऱ्या या महिलेचं कौतुक करावं तितकं कमी आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @buitengebieden यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण महिलेचं कौतुक करताना दिसत आहेत. जखमी प्राण्यांना मदत करणाऱ्या अशा लोकांची खूप गरज आहे, असे काही जण कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The woman adopted the injured street dog watch the heartwarming video asp