Python Climbing Tree :  अजगराचे नाव काढताच अनेकांना भीतीने घाम फुटतो. अनेक धोकादायक प्राण्यांमध्ये अजगराचे नाव घेतले जाते. माणसासह प्राण्याला सहज गुदमरुन मारण्याची ताकद अजगरामध्ये असते. इतकेच नाही तर अजगर अख्खा माणूस देखील सहज गिळू शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा अजगराशी संबंधित व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेतात, त्यातील काही व्हिडीओ हे थरकाप उडवणारे असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महाकाय अजगर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज सरपटत चढताना दिसत आहे. जंगलात फिरणाऱ्या पर्यटकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. त्यामुळे विचार करा हे दृश्य प्रत्यक्षात पाहताना तो पर्यटक किती घाबरला असेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे, जो लोकांना आवडतानाही दिसतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा वाटेत आपल्यासमोर असे धोकादायक सरपटणारे प्राणी येतात, ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. असाच हा अजगराचा व्हिडिओ सध्या लोकांच्या मनात धडकी भरवत आहे, ज्यामध्ये एक महाकाय अजगर झाडावर चढताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असावा. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील वनक्षेत्राचा आहे, जिथे एका पर्यटकाने हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. यातील अजगराची उंची एका महाकाय झाडा ऐवढी आहे, यामुळे तो सहज एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सरपटत जाऊ शकतोय.

जो १८ जून रोजी amritupadhyay नावाच्या इन्स्टाग्राम युजरने आपल्या अकाउंट शेअर केला आहे, हा पाहून तुम्हालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हलक्या काळजाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नका असा सल्ला नेटकर देताना दिसत आहेत. पण जंगलात अशी दुर्मिळ दृश्ये पर्यटकांना क्वचितच पाहायला मिळतात, जी पाहून आश्चर्य वाटते. त्यामुळे आता हा व्हिडिओ आणखीनच व्हायरल (Shocking Video) होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourist shooting video of a huge python anaconda snake terrifying video mp balaghat forest viral in social media sjr