Pune viral video: वाहतूक पोलिसांनी वाहन पकडल्यावर अथवा कारवाई केल्यावर अनेकदा पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वाद होतात. त्यातच अशात सरकारने वाहतूक दंड बऱ्याच प्रमाणात वाढवल्याने असे होणारे वाद आणखीच वाढले आहे. ‘नो पार्किंग’मधील दुचाकी चालकासमोर उचलून टोइंगचे बेकायदा शुल्क उकळणे तसेच गाडी उचलणाऱ्या तरुणांची अरेरावी अशा तक्रारी वाहतूक पोलिसांविरोधात वाढत आहेत.अशातच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये पुण्यात एका महिलेची नो पार्किंगमधली स्कूटी उचलल्यानंतर महिलेनं काय केलं पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, पुणेकरांचा नाद नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. पुणे तिथे काय उणे असं म्हंटलं जातं, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल कारण पुण्यातील या महिलेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुण्यात एका महिलेची नो पार्किंगमधली स्कूटी उचलल्यानंतर महिला थेट त्या गाडीवर चढली आणि गाडी द्या नाहीतर खाली उतरणार नाही अशी धमकी देऊ लागली. माझी गाडी खाली ठेवत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही अशी अट महिलेनं घातली. माझी गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणत ही महिला तिथे भांडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

पाहा व्हिडीओ

रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचं झालं तर दरवर्षी इथं रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. यामुळेच लोकांना हेल्मेट घालण्यासह सुरक्षा उपायांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. असे अनेक व्हिडिओदेखील आहेत, ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. भारतात ड्रायव्हिंगचे नियम अतिशय कडक आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी नियम मोडल्यावर भरावी लागणारी दंडाची रक्कमही पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. तरीही काहीजण वाहतुकीचे नियम मोडतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police towing ladies scooty in pune watch happened next video goes viral on social media srk