Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात, हे व्हिडीओ कधी हसवणारे असतात तर कधी अंगावर काटा आणणारे अपघाताचे असतात. सर्कस म्हंटलं की वेगवेगळे स्टंट आलेच. या सर्कसमध्ये वेगवगळे स्टंट करताना बऱ्याचदा तुम्ही तिथल्या खेळाडूंचे अपघातही झालेले पाहिले असतील. कितीही तरबेज हे खेळाडू असले तरीही, छोट्याश्या चुकांमुळे हे अपघात होतात. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे सर्कसमध्ये खूप उंचावर हे खेळ सुरु असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कधी एखाद्या दोरीचा आधार घेऊन, तर कधी लोंखडी स्टँडवर हे स्टंट करतात. यामध्ये कितीही रिस्क असली तरीही शेवटी पोटासाठी हे कलाकारांना, खेळाडूंना करावंच लागतं. दरम्यान अशाच एका सर्कसमध्ये कलाकार आपली कला सादर करताना, मोठा अपघात झाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

२९ फुटावरु थेट खाली

या धक्कादायक अपघातात हा कलाकार २९ फुटावरु थेट खाली कोसळला, यावेळी प्रेक्षकांमध्येही गोंधळ उडाला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका दोरीला लोंबकळत त्याने झोका घेऊन हात सोडला आणि हवेत तरंगत तो दुसऱ्या टोकावर चालला होता. तिथं तो पोहोचला देखील मात्र, त्याच्या हातांची घट्ट पकड न बसल्यामुळे त्याचा तोल गेला आणि उंचावर उभं राहण्यासाठी असलेलं स्टँडही कोसळलं, काही समजायच्या आतच हा कलाकार २९ फूट खाली कोसळला. या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून सोशल मीडियावर तो जोरदार व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! ठाणे रेल्वे स्थानकात भयंकर गर्दीचा VIDEO होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जगाच्या कान्याकोपऱ्यांतील घटना आजकाल सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचते. सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असत. हा प्लॅटफॉर्म निःसंशयपणे वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहेत. यावर एक व्हिडीओ शूट करून किंवा फोटो टाकून लाखो लोकांपर्यंत सहज पोहोचवता येते. परंतु अनेक वेळा असे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जातात ज्यामुळे गैरप्रकार, घटना समोर येतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video chilean trapeze artist falls 29 foot after platform collapses fired later srk