Viral Video Shows Guy Held Up A Lost Phone : आपल्यातील अनेकांना फोन विसरण्याची सवय असते. कधी कोणाच्या घरी गेलो किंवा एखाद्या दुकानात गेलो की आपण तिकडेच फोन विसरून येतो. एखाद्या दुकानात फोन विसरून आलो तर ठीक आहे, कारण तो दुकानदार त्याच्याजवळ आपला फोन सुरक्षित ठेवू शकतो. पण, जर हेच एखाद्या गर्दीत आपल्या खिशातून फोन पडला की तो सापडणे कठीण होऊन जाते. पण, आज सोशल मीडियावर एका व्यक्तीने (Viral Video) गर्दीत हरवलेला फोन अगदी खास पद्धतीने त्याच्या मालकापर्यंत पोहचवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) परदेशातील आहे. रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. एका तरुणाचा फोन हरवलेला असतो. तो फोन शोधत शोधत या गर्दीमध्ये शिरतो. तिथे एक व्यक्ती हातात फोन घेऊन उभी असते. पण, ज्या व्यक्तीला तो हरवलेला फोन सापडलेला असतो त्याला पुराव्यानिशी हा फोन त्याच्या मालकाकडे सुखरूप पोहचवायचा असतो आणि दुसरीकडे तरुणाला तो फोन आपलाच आहे हे पटवूनसुद्धा द्यायचे असते; तर यासाठी फोन सापडणारी अज्ञात व्यक्ती काय करते, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सध्या फोन वेगवेगळ्या प्रकारे लॉक केला जातो. पासवर्ड, फिंगरप्रिंट किंवा मग फेस आयडी. यामुळे आपल्या हक्काचा फोन दुसरं कोणीच उघडू शकत नाही. तर व्हायरल व्हिडीओत (Viral Video) हीच गोष्ट ओळख पटवण्यासाठी वापरण्यात आली आहे. तुम्ही पाहिले असेल की, माणसांच्या गर्दीत एक अज्ञात व्यक्ती हातात फोन घेऊन उभी असते. तेवढ्यात माझा फोन आहे असे सांगत एक व्यक्ती त्याच्याजवळ येते. पण, फोन हातात देण्यापूर्वी पुरावा म्हणून ती व्यक्ती आधी तरुणाला त्याचा चेहरा मोबाइलसमोर दाखवण्यास सांगते. फेस आयडी चेहरा ओळखते आणि फोन अनलॉक होतो, त्यामुळे हा फोन तरुणाचा आहे हे सिद्ध होऊन जाते आणि एकच जल्लोष जमलेल्या मंडळींमध्ये दिसून येतो.

ही भावना वेगळीच

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pubity या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘कोणीतरी फेस आयडीसह तो फोन त्याचा आहे हा दावा करण्यासाठी येईपर्यंत या व्यक्तीने हरवलेला फोन हातात धरला’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यांच्या भावना मांडताना दिसले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘तुमचा फोन कायमचा हरवला गेला असा विचार केल्यानंतर फोन सापडणे ही भावना वेगळीच आहे’, ‘असा आनंद व्यक्त करत आहेत, जसं काय लॉटरी लागली आहे’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video shows this guy held up a lost phone until someone arrived to claim it with face id asp