लग्न, वाढदिवस, डोहाळे जेवण, लग्नाचा वाढदिवस किंवा एखाद्या खास कार्यक्रम असेल तर केक कापण्याचा जणू एक ट्रेंड सुरु झाला आहे. प्रत्येक जण कार्यक्रम आणखीन खास करण्यासाठी हमखास केक कापतात. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जोडप्याच्या लग्नासाठी एक खास केक आणला आहे ; जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ लग्न समारंभाचा आहे. एका जोडप्याचे रिसेप्शन सुरु असते आणि स्टेजवर नवरा-नवरी उभे असतात. तसेच त्यांच्या समोर एक पाच लेअरचा केक टेबलावर ठेवलेला असतो. हा केक सफेद रंगाचा असून त्यावर कोणतीही डिझाईन सुद्धा नसते. पण, एक प्रोजेक्टर लावण्यात आलेला असतो.तर, या प्रोजेक्टरच्या लाईटमुळे या सध्या केक वर चित्र उमटायला सुरवात होते. लग्नातील प्रोजेक्टर केक एकदा तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…अजगराची अंडी चोरणं पडलं महागात, क्षणात असं काही झालं की…, व्हायरल VIDEO पाहून अंगावर येईल काटा

व्हिडीओ नक्की बघा :

प्रोजेक्टर केक :

बाजारात केकची अनेक दुकाने आहेत. तसेच काही जण घरगुती केक सुद्धा बनवून त्यांचा छोटासा व्यवसाय करत असतात आणि विविध आकार, थीम, किंवा कार्टूनचे सुद्धा केक तयार केले जातात. पण, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सगळ्यात अनोखा केक पहायला मिळाला आहे ; ज्यावर कोणतीही डिझाईन करण्यात आलेली नाही. पण, प्रोजेक्टर लाईटच्या मदतीने त्यावर जोडप्याचे नाव, फोटो आणि अनेक गोष्टी चित्रित करून केकला खास बनवलं जात आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @birbakerzofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण खूप छान कल्पना आहे, केकवर आता डिझाईन करण्याची गरज नाही अशा अनेक कमेंट करताना व्हिडीओखाली दिसून येत आहेत आणि सोशल मीडियावर या खास व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video couple cut the projector cake in the wedding must watch asp