सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपणाला पोट धरुन हसवणारे असतात, तर काही आपणाला आश्चर्यचकित करणारे असतात. शिवाय व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये प्राण्यांच्या व्हिडीओचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. खरं तर, कोणत्याही प्राण्याची विनाकारण छेड काढणे महागात पडू शकते. विशेषत: साप, विंचू किंवा भयंकर वन्य प्राण्यांपासून दूर राहणं अनेकजण पसंत करतात. कारण कधी कोणता प्राणी आपल्यावर हल्ला करेल हे सांगता येत नाही. पण काही काही लोक असे असतात जे मुद्दाम या प्राण्यांशी पंगा घेतात जे त्यांना महागतही पडतं.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीला अजगराची खोड काढणं चांगलच महागात पडलं आहे. कारण या व्यक्तीने अजगराची खोड काढल्यानंतर अजगर त्याच्यावर असा हल्ला करतो की जे पाहून अनेकांच्या अगावर शहारा आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भल्यामोठ्या अजगराची अंडी हळून उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु अजगराला तो माणूस आपली अंडी पळवत असल्याचं समजताच तो त्याच्या डोक्यावर हल्ला करतो.

हेही पाहा- Michaung Cyclone : पुराच्या पाण्यात वाहून आली मगर अन् थेट रस्त्यावर…; VIDEO पाहून घाबराल

अजगराने व्यक्तीवर हल्ला केल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @jayprehistoricpets नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अजगर त्याच्या अंड्याशेजारी निवांत पडला आहे. यावेळी एक व्यक्ती अंडी उचलण्याचा प्रयत्न करतो. यावेळी अजगराला तो अंडी चोरुन नेत असल्याचं समजताच अजगर क्षणात त्या व्यक्तीच्या डोक्यावर दोनदा चावण्याचा प्रयत्न करतो. जे दृश्य खूप भयंकर आहे. मागील महिन्यात शेअर केलेल्या अजगराच्या या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं, “फक्त हाच माणूस असे कृत्य करू शकतो.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “टोपी नसती तर मोठी दुर्घटना घडली असती.”

Story img Loader