Viral Video Shows Grandfather Shifted The Camera Towards His Wife : समोरच्याने आपल्यावर कसे प्रेम करावे याबद्दल प्रत्येकाच्या काही इच्छा-अपेक्षा असतात. कधी आपण त्या मोकळेपणाने व्यक्त करतो, तर कधी त्या मनात ठेवून समोरच्याने ते ओळखावे असा हट्ट असतो. जेव्हा दोन व्यक्ती एका नात्यात अडकतात तेव्हा तिने किंवा त्याने शेवटपर्यंत आपली साथ द्यावी असं त्या प्रत्येक जोडप्याच्या मनात असते. तर आज याचं उत्तम उदाहरण व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. एका आजी-आजोबांचा खास क्षण व्हायरल व्हिडीओत कैद झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) लग्नातील आहे. सगळीकडे लायटिंग लावण्यात आलेली असते आणि अनेक पाहुणेमंडळी सुद्धा या लग्नाला उपस्थित असतात. एक इन्स्टाग्राम युजर सुद्धा या लग्नाला उपस्थित होती. त्यादरम्यान ती तिच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत होती. तेव्हा तिचे लक्ष एका आजोबांकडे जाते. आजोबा एका चिमुकलीचा फोटो काढत असतात. तितक्यात आजोबांची पत्नी समोर येते. आजोबांची पत्नी समोर आल्यावर ते काय करतात व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा…मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

असं प्रेम फक्त या पिढीपुरतं मर्यादित…

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, आजोबा चिमुकलीचा फोटो काढत असताना समोरून त्यांची पत्नी येते. आजी हातात आईस्क्रीम घेऊन चालत येत असतात. त्या हातातलं आईस्क्रीम चिमुकलीला देतात व तिच्याशी काहीतरी संवाद साधताना दिसतात. पण, आजोबा फक्त आजीचा फोटो काढण्यात व्यस्थ असतात. हे पाहून तरुणी भारावून गेली आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये तिने हा क्षण रेकॉर्ड करून घेतला आणि ‘जेव्हा मी म्हणत की मला प्रेम हवे आहे तेव्हा मी हीच अपेक्षा करतो’ असा मजकूर व्हिडीओत लिहिण्यात आला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @padmaja_reddy_vinta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘मी आज एका लग्नाला गेली होती.पत्नी येताच आजोबांनी ज्या प्रकारे कॅमेरा तिच्याकडे वळवला ते पाहायला खूप भारी वाटले’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, ‘बघा सगळ्यांनी मुलींना काय हवं असतं’, ‘असं प्रेम फक्त या पिढीपुरतं मर्यादित आहे’, ‘नातं इथपर्यंत पोहचलं पाहिजे’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows grandfather shifted the camera towards his wife as soon as she came is soo adorable asp