Video Shows Woman Makes Heart Shaped Valentine Paratha : दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. हा प्रेमाचा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी खास असतो. कारण- या खास दिवसाचे निमित साधून तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीवर असणारे प्रेम व्यक्त करण्याची एक विशेष संधी मिळते. तर हा प्रेमाचा दिवस आणखीन खास करण्यासाठी फक्त चॉकलेट, गिफ्ट्स, फिरायला जाणे, एकमेकांना आय लव्ह यू म्हणणे एवढेच पुरेसे असते का? तर नाही… कारण आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे, यामध्ये बायकोने आपल्या नवऱ्यासाठी एक खास व्हॅलेंटाईनचे गिफ्ट स्वतःच्या हाताने बनवून दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॅलेंटाईन डे स्पेशल डेअरी मिल्क सिल्क तुमच्यातील अनेकांनी पाहिली वा नक्कीच खाल्ली असेल. त्यामध्ये पूर्ण कॅडबरी आणि मधोमध गुलाबी रंगाचे हार्ट असते. तर ही गोष्ट लक्षात ठेवून बायको आपल्या नवऱ्याला सरप्राईज देते. कॅप्शननुसार, यशवंत जैन आणि आस्था जैन या जोडप्याचे अरेंज मॅरेज झालेले असते. यशवंतला व्हॅलेंटाईन डे निमित्त गिफ्ट देण्यासाठी आस्था अगदी भन्नाट कल्पना शोधून काढते. व्हॅलेंटाईन डे निमित्त कोणतीही सिल्क न देता बायको तिच्या हाताने गरमागरम पराठे बनवते आणि त्याला अगदी प्रेमळ ट्विस्ट देते.नक्की काय ट्विस्ट दिला आहे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पहिले असेल की, आस्थाने यशवंतसाठी दोन प्रकारचे मेथी आणि बीटाचे पराठे आणि भाजी बनवून आणलेली दिसते आहे. तसेच हे साधे-सुधे पराठे नसून तिने दोन्ही पराठ्यावर व्हॅलेंटाईन डे स्पेशल डेअरी मिल्क सिल्कप्रमाणे हार्ट सुद्धा बनवला आहे. मेथीच्या पराठ्यावर बिटाच्या पराठ्याचा हार्ट आणि बिटाच्या पराठ्यावर मेथीच्या पराठ्याचा हार्ट बनवला आहे, जे पाहून तुम्ही नक्कीच कौतुक कराल. नवऱ्याने या पराठ्याचे नाव ‘व्हॅलेंटाईन एडिशन पराठा’ असे ठेवले आहे.

तू खूप भाग्यवान आहेस…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) @yashvant1123 आणि @ yashukiaashu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘व्हॅलेंटाईन सिल्क, नाही. हा व्हॅलेंटाईन पराठा आहे, अरेंज मॅरेज भीतीदायक आहे’ ; अशी मजेशीर कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा नवऱ्याला नशीबवान आहेस असे म्हणताना दिसत आहेत. ‘ तिने खूप प्रेमाने बनवले आहे, तू खूप भाग्यवान आहेस , तिने प्रयत्न केला आहे महत्वाचे आहे, व्हॅलेंटाईन एडिशन परांठा’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows woman makes heart shaped valentine paratha for her husband asp