तुम्ही अनेकदा लोकांना एकमेकांची खिल्ली उडवताना पाहिलं असेल. ऑफिस असो, शाळा असो की कॉलेज, अनेकदा मित्र-मैत्रिणींसोबत केलेल्या मजा मस्करीचे व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरत नाही. सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा जास्त मजेदार प्रँक व्हिडीओ पोस्ट केले जातात. आता पुन्हा एक नवा प्रँक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की काही मुले रस्त्यावर साऊंड बॉक्स घेऊन लोकांची चेष्टा करत आहेत. हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की तो पाहिल्यास दिवसभर हसू येईल हे मात्र नक्की.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती रस्त्यावर झोपलेली दिसत आहे. तेव्हाच काही मुलं साऊंड बॉक्स घेऊन तिथे पोहोचतात आणि त्याच्या शेजारी ठेवतात. या व्हायरल व्हिडीओमधील मुले अनेक लोकांसोबत मस्करी करताना दिसून येतात. या साऊंडबॉक्स मधून जोरजोरात गोळीबाराचा आवाज येऊ लागला. हा मोठा आवाज ऐकून गाढ झोपलेला माणूस खडबडून जागा होतो आणि इकडे तिकडे पळू लागतो. असाच प्रॅंक इतर लोकांसोबत देखील केला जातो. ते सुद्धा गोळीबाराचा आवाज ऐकून सैरावैरा पळू लागतात. कुणी भिंतीआड लपून बसतं आणि गोळीबार सुरू झाला की काय, या भितीने तिथून पळ काढतं.

हा मजेशीर व्हिडीओ लोकांना खूपच आवडला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक खदखदून हसू लागतात. या प्रॅंक व्हिडीओमध्ये लोकांची जी धांदल उडते ती पाहून तर हसू आवरत नाही. हा व्हिडीओ पाहणारा व्यक्ती कोणत्याही मूडमध्ये असला तरी त्याला पोट धरून हसायला लावणारा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ लोकांना किती आवडला ते या व्हिडीओच्या व्ह्यूजचे आकडेच सांगतात. आतापर्यंत या व्हिडीओला १ कोटी ५७ लाखांहून व्ह्यूज मिळाले आहेत.

आणखी वाचा : एकट्या बिबट्यावर तीन-तीन रानडुक्कर शिकारीसाठी तुटून पडले, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : घोडीवरून उतरून वरातीत पोहोचला नवरदेव, मग असा जबरदस्त डान्स केला…पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडिओ 1- More FUN नावाच्या YouTube अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत आणि शेअर करत आहेत. हा व्हिडीओ एकदा पाहून मन भरत नाही, यासाठी लोक हा व्हिडीओ वारंवार पाहत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video today hansi ka video funny video google trends boys did funny prank with sleeping man see what happened next this prp