Pigs eat Leopard shocking video: तुम्ही कधी रानडुकरांना बिबट्याची शिकार करण्याचा प्रयत्न करताना पाहिलं आहे का? तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडीओ एकदा पाहाच! खरं तर, या व्हिडीओमध्ये डुकरांचा कळप रस्त्यावर पडलेल्या एका बिबट्यावर अक्षरशः तुटून पडले आहेत. तीनही बाजूंनी तीन तीन रानडुकरे बिबट्याला खाण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. मात्र, या कळपानेच बिबट्याला मारले की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. हा व्हायरल व्हिडीओ पाहताना अंगावर काटा येतो.

@WildLense_India या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूमधल्या पलानी ते कोडाईकनाल रोडवर घडला असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हिडीओमधला बिबट्या एखाद्या अपघातात मरण पावला असेल, असा अंदाज काही युजर्स व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा : पाठवणीच्या वेळी नवरीऐवजी नवरदेवच ढसाढसा रडला, पाहा हा VIRAL VIDEO

या व्हिडीओमध्ये डोंगर रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत पडलेला दिसत आहे. तीन रानडुक्कर त्याच्या अवती भवती फिरताना दिसतात. जवळच एक बस उभी आहे, तो बसचालक हॉर्न वाजवून रानडुकरांना पळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र बिबट्याला ओरबाडणारी डुकरे मेलेला बिबट्या खाण्यात व्यस्त असलेले दिसून येत आहेत.

आणखी वाचा : घोडीवरून उतरून वरातीत पोहोचला नवरदेव, मग असा जबरदस्त डान्स केला…पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : OMG! उकळत्या तेलात हात घालून तळतोय भजे; विश्वास बसत नाही तर पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक युजर्सनी या व्हिडीओला लाईक करत आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.