सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसात घामाने हैराण व्हायला होते. अशावेळी लोकांना थंड पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची इच्छा जास्त होते. अशा परिस्थितीत लोक प्रवास करताना उन्हापासून बचाव करण्यासाठी रेल्वेस्थानकाबाहेरील दुकानात लिंबू पाण्याचा किंवा सरबताचा आधार घेतात. पण, ते बनवताना स्वच्छतेची किती काळजी घेतली जाते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल तर एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहा आणि जरा सावधान व्हा. यात मुंबईतील रेल्वेस्थानकाबाहेर लिंबू सरबत, ज्यूस बनवणारी व्यक्ती जे कृत्य करतेय ते पाहून आयुष्यात तुम्ही कधी पुन्हा अशा ठिकाणी लिंबू सरबत पिणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, खारघर रेल्वेस्थानकाबाहेर एक विक्रेता ज्या हाताने लिंबू सरबत, ज्यूस बनवतो, त्याच हाताने आपलं शरीर खाजवताना दिसतोय. हात न धुता किंवा कसलीही स्वच्छता न बाळगता त्याच हाताने तो पुन्हा ग्राहकांना ज्यूस बनवून देत आहे. पण, असे प्रकार आपल्या मुंबईतील अनेक ज्यूस सेंटरवर पाहायला मिळतात. हात न धुता किंवा स्वच्छतेची काळजी न घेता अतिशय गलिच्छ प्रकारे विक्रेते ज्यूस, सरबत विकत असतात.

शाळा आहे की ब्युटी पार्लर! चक्क शाळेत बसून फेशियल करणाऱ्या मुख्याध्यापिकेचा Video काढल्याने शिक्षिकेला मारहाण

@Abhimanyus78 नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने मिश्लीकपणे लिहिले की, असे अनधिकृत फेरीवाले नक्कीच लोकांचे आरोग्य बळकट करतील. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. तसेच अशाप्रकारे अस्वच्छ पद्धतीने ज्यूस बनवणाऱ्या लोकांवर कारवाईची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video unhygienic lemon juice selling at kharghar railway station mumbai sjr