Train Stunt Viral Video: आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत असतात. कधी कॉमेडी, तर कधी डान्स व्हिडीओ, तसेच इन्फॉर्मेटिव्ह व बरेच क्राफ्ट व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. हे व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकदा आपण लगेच स्क्रोल करतो; परंतु काही धक्कादायक व्हिडीओ कायम लक्षात राहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा स्टंटबाजी करताना पाहिली असेल; पण ते स्टंट खूप काळजी घेऊन केले जातात. सिनेमाची गोष्ट सोडली, तर आता अनेक जण प्रत्यक्षात प्रसिद्धी, सोशल मीडियावरील काही व्ह्युज, लाइक्ससाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि स्टंट करतात. हे स्टंट पाहून अनेकदा आपल्याच अंगावर काटा येतो. या स्टंटबाजीमध्ये अनेकदा त्यांचा जीवदेखील जातो. सध्या असाच जीवघेणा स्टंट एका तरुणाने केलाय आणि हा स्टंट त्याच्या अंगलट आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक मुलगा ट्रेनच्या दरवाजावर लटकून उभा राहिला होता. एवढंच नाही, तर तो उभा राहून डान्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टंटही करीत होता. ट्रेनमध्ये लटकत असताना मागे बघता बघता अचानक मधे एक खांब आला आणि त्या खांबाला आपटून तो मुलगा ट्रेनच्या बाहेर कोसळला. त्या खांबाची एवढ्या जोरानं त्याला धडक लागली की, तो थेट उडून खाली पडला. ट्रेनमधील एक माणूस हा व्हिडीओ शूट करीत असल्याचं या व्हिडीओतून कळतंय. तरी हा प्रकार नेमका कुठे घडला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

हा व्हिडीओ @marathi.reel.wala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला तब्बल ६३.३ लाख व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत तरुणाद्दल संताप व्यक्त केला आहे. एका युजरने कमेंट करीत लिहिलं की, असली फालतूगिरी करायचीच कशाला. तर दुसऱ्याने, एवढा माज नाही पाहिजे माणसाला, अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young boy doing stunt in local train viral video on social media dvr