स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या आई माझी काळुबाई या मालिकेत झळकत आहे. प्राजक्ता अभिनयासोबतच तिचं शिक्षण पूर्ण करत असून सध्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. यामध्येच इंजिनिअरिंगच्या पेपरदरम्यान तिच्यासोबत एक धम्माल किस्सा घडला आहे. याविषयी तिने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.