संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे आगमन पुणे शहरात आगमन झाले. यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी शिवाजीनगर गावठाण येथील जंगली महाराज मंदिरात राज्याच्या अनेक भागातून आलेल्या धारकर्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर भिडे गुरुजी हे हजारोंच्या संख्येने संचेती रुग्णालय येथील पुलाच्या ठिकाणी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे आगमन होणार्या ठिकाणी मार्गस्थ झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होताच संभाजी भिडे गुरुजींनी या पालखीचं सारथ्य केलेलं पाहायला मिळालं.


















