गणेशोत्सवादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ते आले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची एकच चर्चा सुरू आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “कसली नाराजी आणि कसलं काय? यामागे राजकारण आहे. शिंदे सरकारचा बळी घेण्याचा प्लॅन झालेला आहे”, असं सूचक विधान वडेट्टीवारांनी केलं.