Bageshwar Dham: धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुण्यात!; तुकाराम महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२३ दरम्यान या तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन पुण्यातील भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी संगमवाडी येथे केले आहे. यासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुण्यात आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी संत तुकाराम महाराज, साईबाबा यांच्याबद्दलच्या याआधी केलेल्या वक्तव्यांबद्दल स्पष्टीकरण दिलं.