अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा गेल्या सहा दिवसांपासून चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे. या उत्सवाची आज (१८ डिसेंबर) सांगता होणार असून राज्यभरातून लाखो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं. खंडेरायाला भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवुन या उत्सवाची सांगता होते आहे.